Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

जन्मसहयोगी / Birthcompanion

हल्ली नवीन ट्रेंड आला आहे हा .. जन्मसहयोगी किंवा Birth Companian. म्हणून आज त्या विषयी जाणून घेऊया.

जन्मसहयोगी किंवा Birth Companian म्हणजे अशी व्यक्ती की जी प्रसुती (डिलिव्हरी)च्या वेळी गरोदर स्त्री बरोबर शेवट पर्यंत असते. परदेशात प्रसुती च्या वेळी बहुतेक वेळा पती हा पत्नी च्या बरोबर शेवट पर्यंत असतो हे सर्वांना माहीत असेलच.

जन्मसहयोगी किंवा birth companian ही व्यक्ती कोणीही असू शकते. गरोदर स्त्री ज्या व्यक्ती बरोबर कम्फ़र्टेबल असेल अश्या एका व्यक्तीला ती प्रसुती दरम्यान तिच्या जवळ थांबवून घेऊ शकते. हेतु हा की प्रसूती वेदना सहन करणे हे गरोदर स्त्री ला सुसह्य व्हावे आणि तिला धीर मिळावा. भारत सरकारने सुद्धा या कल्पनेला प्रोत्साहन दिले आहे.

'जन्मसहयोगी' किंवा 'जन्मसखी' ही बहुधा अनुभवी स्त्री असते आणि ती पहिलटकरीणीला मदत करत असते. डॉक्टर आणि पेशंट मधले संभाषण यामुळे सोपे व्हावे हा हेतु यामध्ये असतो.

प्रत्यक्ष बाळाच्या जन्माच्या वेळी जन्मसहयोगी असणारी व्यक्ती 'लेबर रूम 'अथवा डिलीव्हरी च्या खोलीत असावी की नाही या बद्दल अजूनही साशंकता आहे.

  • 1. कारण डिलीव्हरी च्या वेळी पूर्णत: निर्जंतुकीकरण पाळणे गरजेचे असते आणि त्याकरता कमीत कमी लोक तिथे हजर राहणे अपेक्षित असते.
  • 2. डिलिव्हरी च्या वेळी होणारा रक्तस्त्राव आणि इतर गोष्टी कधी कधी या जन्मसहयोगी व्यक्तीला सहन होतातच असे नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला चक्कर येणे, उलटी होणे इत्यादी त्रास होऊ शकतात आणि पेशंट ला सोडून या जन्मसहयोगी व्यक्ती च्या मागेच डॉक्टरांना बघावे लागते
  • 3. सिझेरियन करावे लागणार असेल तर ऑपरेशन थेटर मध्ये जास्ती जास्त निर्जंतुक वातावरण राहावे म्हणून सहसा जन्मसहयोगी व्यक्तीला येऊ दिले जात नाही. यामध्ये आई आणि बाळाची सुरक्षितता हा हेतू असतो
  • 4. डिलीव्हरी झाली की लगेच बाळ जन्मसहयोगी म्हणून जरी नवरा तिथे हजर असला तरी त्याच्याकडे देत नाहीत तर आधी बाळाचे डॉक्टर त्या बाळाला तपासतात आणि मग प्रथम ते बाळ आई ला दाखवून मग इतर नातेवाईकांना दाखवतात. (काही जणींना वाटते की बाळ जन्मले की लगेच नवरा डिलीव्हरी रूम मध्ये असेल तर लगेच तो बाळाला पकडेल)
  • 5. काही गुंतागुंतीची डिलिव्हरी असेल तर डॉक्टर 'जन्मसहयोगी' व्यक्तीला परवानगी देतात च असे नाही कारण डॉक्टरांना मोकळेपणाने आणि पटापट निर्णय घेताना त्यांच्या स्टाफ खेरीज इतर व्यक्ती ची अडचण वाटू शकते.

थोडक्यात, डिलीव्हरी च्या कळा सुरू झाल्या पासून ते गर्भपिशवीचे तोंड पूर्ण उघडे पर्यंत जन्मसहयोगी व्यक्ती पेशंट जवळ थांबायला हरकत नाही पण प्रत्यक्ष बाळ जन्मताना मात्र तिथे थांबायला तुमचे डॉक्टर परवानगी देतील की नाही हे त्या त्या पेशंट च्या परिस्थिती वर अवलंबून असते. जे काही तुमचे डॉक्टर सुचवतात ते आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठीच असते. म्हणून वाईट न वाटून घेता ते स्वीकारा म्हणजे डॉक्टरांना ही काम करणे सोपे जाईल आणि तुम्ही ही नाराज होणार नाही खरे ना?

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811