Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

सुरक्षित गर्भपात / Safe Abortion

तन्वी आणि दिनेश एक सुसंस्कृत couple....दोघेही working त्यामुळे दिवसभर धावपळ...लग्नाला 6 महिने झाले होते आणि राजा राणी चा संसार त्यामुळे ‘नव्याची नवलाई’ अजून संपली नव्हती. सगळं सुरळीत सुरु असताना तन्वीची pregnancy test positive आल्याने गोंधळून गेलेले दोघे माझ्या समोर बसले होते. अर्थातच बाळाची जवाबदारी त्यांना इतक्या लवकर नको होती आणि गुगल वर सर्च करून ऑफिस ला जाता जाता गर्भपाता साठी लागणाऱ्या गोळ्या घेऊनच जावे म्हणून ते आले होते. फार फार तर 15 मिनिटांचे काम असा त्यांचा अँप्रोच होता.

आजकाल कित्येक जोडपी किंवा अविवाहित मुले मुली सुद्धा ह्या गोळ्या विषयी अगदी सहज सोपे काम असे बघताना दिसतात.....करा pregnancy test घ्या गोळ्या आणि व्हा रिकामे इतकी ही गोष्ट सोपी नाही.ह्या मध्ये ही धोके आहेत आणि म्हणूनच ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे.

Abortion अथवा गर्भपात हा नेहमीच गुंतागुंतीचा असतो आणि तो सुरक्षितपणे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व देखरेखी खाली करायला हवा.तुमच्या सुरक्षितते साठी काही नियम पाळायलाच हवे. त्या मध्ये कोणताही ‘शॉर्ट कट ‘ नको. या पैकी काही महत्त्वाच्या गोष्टी

  • 1. सोनोग्राफी ही अत्यावश्यक आहे. यामुळे गर्भधारणा गर्भ नलिकेत नाही याची खात्री होते.(ectopic pregnancy)
  • 2.काही रक्ताच्या तपासण्या जसे HB BT CT इत्यादी गरजेच्या आहेत.
  • 3. ह्या तपासण्याचे रिपोर्ट आल्यावर सरकार ने आखून दिलेल्या नियम नुसार काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे जसे की C आणि I U फॉर्म.
  • 4. गर्भवती महिलेची ओळख ही कायद्या नुसार आम्हा डॉक्टरांना गुप्त ठेवणे बंधन कारक असते.(त्यामुळे unmarried मुलींनी घाबरू नये व या formalities टाळून अयोग्य मार्ग वापरू नये).
  • 5. गर्भवती महिला तिच्या एकटीच्या सहीने गर्भपात करू शकते पण नवऱ्याची किंवा बॉयफ्रेंड ची सही सुद्धा असणे नेहमी चांगले.
  • 6. गोळ्या घेतल्यावर 48 तास तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात असणे गरजेचे आहे.
  • 7. सर्वात महत्त्वाचे म्हणजे १५ दिवसांनी पुन्हा सोनोग्राफी करून गर्भपात पूर्ण झाला आहे की नाही ते बघणे गरजेचे आहे.ही स्टेप पेशंट नेहमीच टाळतात.
  • 8. जास्त किंवा अनियमित रक्तस्त्राव, अर्धवट गर्भपात,इन्फेक्शन, पुन्हा गर्भधारणा राहण्यास त्रास होणे, किंवा pregnancy तशीच continue होणे हे आणि इतर काही या गोळ्यांचे साईड इफेक्ट आहेत.
  • 9. तसेच पुन्हा पुन्हा या सगळ्यातून जायला लागू नये म्हणून योग्य ते गर्भनिरोधक उपाय वापरणे गरजेचे आहे.

म्हणून च सांगते मैत्रिणींनो,

तन्वी आणि दिनेश झटपट visit साठी येतात आणि मी सांगितलेली माहिती ऐकून विचारात पडतात ...’ अरे बापरे आम्ही तर इतका विचार केलाच नव्हता डॉक्टर ... तुम्ही या पद्धतीने (गोळ्या घेऊन) abortion करताना असणारे धोके आम्हाला सांगितले, मग मला असं विचारायचं आहे डॉक्टर..”की जेव्हा आम्ही चान्स घ्यायचा ठरवून pregnancy प्लॅन करू तेव्हा काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना आत्ता गोळ्याघेऊन गर्भपात केल्याने?”

या प्रश्नांचा सामना आम्हा स्त्री रोग तज्ञांना नेहमी करावा लागतो.

गर्भपाता साठी आलेल्या जोडप्याना ही pregnancy नको असते पण त्या बरोबर त्यांना हवे तेव्हा तेकोणतीही अडचण न येता प्रेग्नंट होऊ शकतील अशी १००% हमी डॉक्टरांकडून हवी असते.

सख्यानो, इथे मला तुम्हा सर्वांना स्पष्ट सांगावेसे वाटते की अशी १००% खात्री तुम्हाला कोणताच स्त्री रोग तज्ञ देऊ शकणार नाही.

‘तुम्हाला किती दिवस pregnancy नको आहे?’ या प्रश्नाचे उत्तर almost सगळी जोडपी ‘अजून १ ते २ वर्षे नको डॉक्टर’ असे देतात.

अजून एक ते दोन वर्षांनी पती आणि पत्नी यांच्यात शारिरीक बदल जसे की वजन वाढणे, हार्मोन ची पातळी बदलणे हे होणार नाहीत असे कसे सांगता येईल?२. सुरक्षित गर्भपाता नंतर होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स चे प्रमाण 10% असले तरीही तुम्ही 90% मध्ये येणार(ज्यांच्यात काहीही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत) की 10% मध्ये हे तुम्हाला कोणीही आज सांगू शकणार नाही.

मग आता पुढे कसे जायचे?मार्ग कसा काढायचा यातून? तर....

खरोखरच आपल्या ला ही pregnancy नको आहे का? याचा पुनर्विचार करायचा. कित्येक जोडपी Pregnancy test positive आली की घाबरून जातातआणि न विचार करताच गर्भपाताचे ऑपशन निवडतात. आज टेस्ट positive असली की लगेच उद्यापासून बाळ घरी येत नाही तर मध्ये ९ महिन्याचा कालावधी आहे त्या मध्ये आपण बाकीच्या गोष्टी ऍडजस्ट करू शकू का हे परत तपासून पाहायचे . कारण ‘FIRST PREGNANCY IS ALWAYS BEST PREGNANCY' आणि या प्रश्नाचे उत्तर नाही असे आले तर....

तर...डोळे उघडे ठेवून पूर्ण जवाबदारी स्वीकारून धोके लक्षात घेऊन मग गर्भपाताचा निर्णय घ्यायचा ....नीना , राजीव आणि नीना च्या सासूबाई तिघे माझ्यासमोर बसले होते. 3 वर्षा पूर्वी नीना आणि राजीव ने घरी कोणालाही न सांगता पहिली pregnancy abort केली होती आणि वर्षभर प्रयत्न करूनही नीना ला आता दिवस राहत नव्हते. निनाच्या सासूबाई आणि राजीव यांच्या मते निनाला तेव्हा करीयर करायचे होते म्हणून त्यांनी गर्भपात केला होता त्यामुळे आजच्या परिस्थितीला तीच जवाबदार होती . म्हणून आत्ताच्या उपचारांचा खर्च सर्वस्वी तिनेच उचलायला हवा असे त्या दोघांचे म्हणणे होते.

सुमेधा आणि यश च्या बाबतीत सुमेधा pregnancy साठी तयार होती पण यश ला जवाबदारी नको होती म्हणून त्यांनी abortion केले होते आणि आता दिवस राहत नव्हते तेव्हा सुमेधा ने सारा दोष यशाच्या माथी मारला होता.

निशाने लग्नापूर्वी च pregnancy राहिल्यामुळे गर्भपात केला होता आणि आता दिवस राहत नाहीत म्हणून लग्नानंतर ती अनेक ठीकाणी उपचार घेऊन आली होती,पण पतीला ती याबद्दल काहीच सांगू शकत नव्हती.

अशा एक ना अनेक केसेस आम्हाला पाहायला मिळतात. असा ब्लेम गेम आणि अशी घुसमट तुम्ही तेव्हाच टाळू शकता जेव्हा आजचा निर्णय तुम्ही पूर्णविचारांती आणि जवाबदारी स्वीकारून घेता.

म्हणून च म्हणते सख्यानो,

‘FIRST IS ALWAYS BEST ; NEVER LET IT GO WASTE'

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811

Untitled Document