Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

काळजी नाजूक जागेची / Care Delicate Space

स्तनाची काळजी आणि स्तनाचे आजार याविषयी आपण नेहमीच वाचतो पण योनीमार्गाची काळजी रोज कशी घ्यायची रोजच्या धावपळीत हे फारसे चर्चिले जात नाही . या काही लहान सहान गोष्टी आपण पाळल्या तर हे शारीरिक स्वच्छते चे काम सोपे होऊन जाईल.

  • 1. कपडे – पँटी किंवा निकर या सुती आणि स्वच्छ असाव्यात. त्या धुताना त्या मध्ये सर्फ , रिन इत्यादी सारखे स्ट्रॉंग ऍसिड असणारा साबण वापरतो तेव्हा त्या खळबळून भरपूर पाण्यात धुणे गरजेचे आहे.साबण नीट धुतला गेला नाही की या ऍसिड मुळे नाजूक जागेच्या त्वचेला खाज सुटणे तसेच लालसर पणा येणे , कोरडेपणा येणे असे त्रास होतात. या प्रकारच्या तक्रारी लहान मुली आणि वयस्कर महिला यामध्ये जास्त आढळतात.
  • 2. दिवसातून दोन वेळा (आणि गरज पडल्यास जास्त वेळा) तरी पँटी बदलली पाहिजे.मुली शाळेतून आल्यावर जसे वरचे कपडे बदलतात तसेच त्यांना अंतर्वस्त्रे ही त्यावेळी बदलायला लावणे अत्यावश्यक आहे. अंतर्वस्त्रे ही शरीराच्या अगदी जवळ असतात त्यामुळे त्यांची स्वच्छता ही बाह्यवस्त्रांपेक्षा जास्त महत्वाची आहे परंतु बहुतेक वेळा स्त्रियांकडे अंतवस्त्रा च्या जोड्या कमी आणि बाह्यवस्त्रे भरपूर प्रमाणात असतात ! ओलसर राहणारी अंतर्वस्त्रे ही इन्फेक्शन होण्याचे महत्वाचे कारण आहे. पुरेशी अंतर्वस्त्रे प्रत्येकी कडे असणे अतिशय महत्वाचे आहे. ( निदान ६ ते ८ जोड...)
  • 3. ओलसरपणा टाळण्यासाठी प्रत्येक वेळी बाथरूम ला जाऊन आल्यावर लघवीची जागा धुणे आणि मऊ कापडाने ती कोरडी करणे गरजेचे आहे. यासाठी वेगळा सुती टॉवेल बाथरूम मध्ये नेहमी ठेवणे गरजेचे आहे. ‘सॉफ्ट टिश्यू’ वापरायला ही हरकत नाही.
  • 4. पाळीच्या ठरावीक दिवशी (10 ते 16या दिवसा मध्ये) निसर्गतः काही अंतस्त्राव वाढलेले असतात. तसेच वयात आलेल्या मुलीं मध्ये ही हे अंतस्त्राव वाढलेले असतात . अश्या वेळी सुद्धा ओलसरपणा टाळण्यासाठी कमीत कमी दोन दा तरी पँटी बदलणे आवश्यक आहे.

अनेकदा पेशंट बरोबर बोलताना मला हे जाणवले की याबद्दलची जागरुकता स्त्रियांमध्ये नसते आणि त्या दिवसातून 3 वेळा - कामाला जाताना, कामावरून आल्यावर आणि रात्री झोपताना बाहेरचे कपडे बदलतात पण शरीरा जवळ असणारे कपडे आज आंघोळ करून घातले की २४ तासांनी दुसऱ्या दिवशी अंघोळी नंतर च बदलतात ! हे योग्य नाही. गोष्ट लहानच आहे पण त्याची गरज किंवा सवय किंवा ही संकल्पना त्यांना नसते

  • 5. हल्ली बाजारात वेगळे वेगळे लिक्विड साबण खास नाजूक जागेच्या स्वछते साठी मिळतात. त्याचा अतीवापर टाळावा. या साबणामुळे अतिकोरडेपणा येऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
  • 6. पाळी च्या वेळी दर ६ तासांनी ‘सॅनिटरी पॅड’बदलणे गरजेचे आहे. कित्येक जणी कमी रक्तस्त्राव आहे म्हणून पॅड योग्यवेळी बदलत नाहीत.
  • 7. या जागेचे केस पूर्ण काढण्यापेक्षा ट्रिम केलेले चांगले.
  • 8. खाज किंवा इन्फेक्शन झाल्यास डॉक्टरांना विचारून च औषध घ्या... अनेकदा स्त्रिया औषधाच्या दुकानातून परस्पर गोळ्या घेतात आणि मग दुखणे वाढवून डॉक्टरांच्या कडे येतात.

थोडक्यात वरील सर्व गोष्टी साध्या सोप्या आहेत पण या बद्दल फारशी जागरूक ता नसल्याने बऱ्याच जणी त्या पाळत नसतात.

या गोष्टी जाणून घेऊन आपण स्वतः मध्ये योग्य ते बदल करू या आणि आपल्या मुलींना ही हे शिकवू या !

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811