Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

काळजी नाजूक जागेची / Care Delicate Space

प्रथमत: मागच्या भागाला दिलेल्या उत्तम प्रतिसाद बद्दल धन्यवाद ! खरे तर दुसरा भाग लिहावा असे काही मनात नव्हते पण तुमच्या पैकी खूप जणींनी काही ठराविक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले म्हणून काही गोष्टी बद्दल विस्तृत लिहीत आहे.

  • 1. पहिला प्रश्न अनेक जणींनी विचारला तो बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या Ph balance wash बद्दल.... हे साबण नाजूक जागेच्या स्वच्छतेसाठी रोज वापरावेत का आणि लहान मुलींना याची सवय लावावी का ? ज्या काही ट्रायल्स या साबणाच्या वापरा बद्दल उपलब्ध आहेत त्याच्या अभ्यासानंतर असा निष्कर्ष निघाला की हे liquid wash रोज वापरण्याची गरज नाही. लहान मुलींना याची सवय लावू नये. काही इन्फेक्शन झाले असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने मर्यादीत काळा साठी हे वापरावेत. रोज मात्र स्वच्छ पाण्यानेच प्रत्येक वेळी बाथरूम ला गेल्यावर ही जागा धुवून घ्यावी आणि कोरडी ठेवावी. निसर्गतः असलेला या जागेचा Ph हा इन्फेक्शन टाळण्यासाठी असतो आणि साबणाच्या अति वापराने तो बिघडू शकतो.
  • 2. दुसरा प्रश्न होता या जागेचे waxing करणे योग्य आहे का? याबद्दल ही जी काही शास्त्रीय माहीत उपलब्ध आहे त्या मध्ये असे सांगितले आहे की या जागेचे waxing करून पूर्ण केस न काढता फक्त ‘ट्रिमिंग’ करावे. पुन्हा पुन्हा Waxing करताना केसांच्या मुळाला धक्का लागून इन्फेक्शन होऊ शकते तसेच या जागेच्या सुरक्षितते साठी pubic hair काही प्रमाणात गरजेचे असतात , म्हणून waxing करून पूर्ण केस काढणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही.
  • 3. तिसरा प्रश्न होता ‘menstrual cup’ बद्दल... ‘सॅनिटरी पॅड’ वापरावे की menstrual कप? आणि मुलींना लग्ना आधी हे कप वापरू द्यावेत का? याबद्दल तुलना करता असे दिसून येते की पर्यावरणाचा विचार करता menstrual cup वापरणे कधीही चांगले कारण ते पुन्हा पुन्हा तुम्ही वापरू शकता. सॅनिटरी पॅड चे विघटन हा मोठ्ठा प्रश्न आहे. चांगल्या कंपनी चे कप वापरणे योग्य होईल. मुली लग्ना आधी सुद्धा हे कप वापरू शकतात. पण menstrual कप योग्य पद्धतीने बसवणे थोडे अवघड पडू शकते त्याची थोडी सवय होणे गरजेचे आहे पॅड इतकी ही क्रीया सोपी नाही आणि मुलींना हे थोडे कटकटीचे वाटते. म्हणून मुलींची पाळी सुरु झाली आणि त्या पाळीशी मानसिकरित्या ऍडजस्ट झाल्या की मग त्यांना हा menstrual कप चा पर्याय सुचवायला हरकत नाही. Menstrual कप योग्य पध्दतीने स्वच्छ मात्र केले पाहिजेत.
  • 4. पँटी लायनर – याबद्दल ही बऱ्याच जणींनी विचारले की हे रोज वापरावे का? या बद्दल ही जी शास्त्रीय माहिती उपलब्ध आहे त्यानुसार नियमित ‘पँटी लायनर’ वापरले तर उलट या जागेचा दमटपणा जास्त वाढतो आणि मग जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ही वाढते. त्यामुळे काही मर्यादीत कालावधी पुरते च हे वापरणे योग्य आहे. आधीच्या लेखात सांगितल्या प्रमाणे दिवसातून दोन वेळा किंवा गरज पडल्यास जास्त वेळा पँटी बदलणे हे जास्त योग्य आहे

थोडक्यात आपण चर्चा केलेल्या सोप्या आणि लहान गोष्टी जर आपण नीट पाळल्या आणि आपल्या मुलींना ही शिकवल्या तर नाजूक जागेची स्वच्छता ठेवणे अवघड नाही.

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811