Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

'मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये'... तस "पपई बदनाम हुई प्रेग्नंन्सी तेरे लिये" असं म्हणावं लागेल.

लअसा विचार सकाळी सकाळी मनात येण्याचं कारण म्हणजे 'स्वरा आणि अभिजित'...आज क्लिनिक ची सुरुवात झाली ती 'स्वरा' च्या रडण्याने... 2 महिन्याची गरोदर असलेल्या स्वराने सकाळी नाश्ताल्या प्लेट भरून पपई खाल्ली आणि फोनवर बोलता बोलता ही गोष्ट सासूबाईंना सांगितली ... झालं त्यांनी तिला इतकं घाबरवून टाकलं आणि वर अभिजित ला ही ओरडल्या की, "इतकं कसं ठाऊक नाही तुम्हाला? पपई मध्ये बाळावर वाईट परिणाम करणारी विषारी द्रव्य असतात आणि त्यामुळे गर्भपातही होऊ शकतो" झालं घाबरलेल्या स्वराने तिच्या आईला फोन केला आईचं ही मत यापेक्षा काहीही वेगळं नसल्यामुळे तिची घाबरगुंडी उडाली आणि मग आपण काहीतरी खूप मोठी चूक केली आहे या विचाराने तिला रडू फुटलं.

आज 'स्वरा' च्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचीच बोलावसं वाटलं गरोदर झाल्यानंतर आहारात काय काय बदल करायला हवेत आणि कोणत्या गोष्टी समाविष्ट करायला हव्यात या प्रश्नाबरोबरच पेशंट आम्हाला नेहमी विचारतात की डॉक्टर कोणत्या गोष्टी खाण्याचे टाळावे? आणि या खाण्याचं टाळण्याचे यादी मध्ये पहिला नंबर असतो तो पपईचा ..

आज 'स्वरा' च्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचीच बोलावसं वाटलं गरोदर झाल्यानंतर आहारात काय काय बदल करायला हवेत आणि कोणत्या गोष्टी समाविष्ट करायला हव्यात या प्रश्नाबरोबरच पेशंट आम्हाला नेहमी विचारतात की डॉक्टर कोणत्या गोष्टी खाण्याचे टाळावे? आणि या खाण्याचं टाळण्याचे यादी मध्ये पहिला नंबर असतो तो पपईचा ..

आता मला सांगा आपल्यापैकी किती जण खरोखरच कच्ची किंवा अर्धी कच्ची पपई खातात? त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

पिकलेली पपई गरोदरपणात खाल्ली तर त्यामुळे कोणताही वाईट परिणाम गर्भावर होत असल्याचे अथवा त्यामुळे गर्भपात होत असल्याचे प्राण्यांवर केलेल्या संशोधनात आढळून आलेले नाही आणि गरोदर स्त्रियांमध्ये देखील पिकलेली पपई खाल्ल्यामुळे त्यांच्या गर्भावर वाईट परिणाम झाला आहे किंवा त्यांचा गर्भपात झाला आहे असे शास्त्रीय दृष्ट्या आढळून आलेले नाही. त्यामुळे पूर्ण पिकलेली पपई गरोदरपणात खायला काही हरकत नाही उलट पूर्ण पिकलेल्या पपई मध्ये अनेक पोषक द्रव्ये जसे की विटामिन ए विटामिन सी अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे त्यापासून धोका उद्भवण्याची शक्यता नाही

सारांश

१. अर्धी कच्ची किंवा कच्ची पपई गरोदरपणात खाऊ नये.

२.पिकलेल्या पपई गरोदरपणात खाल्ल्याने कोणतेही दुष्परिणाम गर्भावर किंवा गरोदर स्त्री वर दिसून आलेले नाहीत.त्यामुळे प्रमाणात किंवा चुकून गरोदरपणात पपई खाल्ली तर घाबरून जायचे कारण नाही.

या सर्व गोष्टी स्वरा आणि अभिजित ला समजावून सांगितल्यावर दोघे ही आनंदाने घरी गेले हे वेगळे सांगायला नको.

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811